Monday 1 August 2011

आधुनिक बोधकथा धावाधाव




व्यकीमत्त विकासाच्या एका वर्गामध्ये आम्ही शिकत होतो . आम्हाला शिकवणारे जे शिक्षक होते त्यांनी एकदा आम्हा सर्वांना त्यांच्या जवळ बोलावले . त्याच्या टेबल होता. खुर्ची होती . तिथे आम्ही सर्व जण उभे राहिलो . नजरेपुढं लाबंच लांब हॉल . ते शिकवणारे गुरुजी म्हणाले , चला एक प्रयोग करुया ! . आपण असे ठरवूया की , जो धावत जाऊन सर्वात प्रथम भिंतीला हात लावेल तो जिंकेल .
            एक दोन तीन सुरु पळा . आणि सर्वज़ण पळायला लागले . घामाघूम होत समोरच्या भिंतीला हात लावण्याचा ज्याने त्याने प्रयत्न केला , आणि हॉलची लांबी कमी असल्यामुळे जवळ जवळ प्रत्येक जण एकाच वेळी त्या भिंतीला हात टेकवून परत आला. गुरुजींनी सर्वांना जवळ बोलावले आणि म्हणाले , की . तुमच्या  मागे भिंत नव्हती काय ? होती . तुमच्या उजव्या बाजूला भिंत नव्ह्ती काय ? होती . तुमच्या डाव्या हाताला भिंत नव्ह्ती काय ? होती . तुमच्या उजव्या , डाव्या हाताला आणि पाठीमागच्या बाजुला देखील भिंत होती . परंतू गुरुजी म्हणाले होते की , धावत जाऊन भिंतीला हात लावायचा आहे . म्हणजे समोरील भिंतीला हात लावायला आहे. आणि सर्वजण आम्ही वेड्यासारखे त्या पुढच्या भिंतीकडे धावलो होतो . आणि आजूबाजूच्या भितीला देखील हात लावल्या शकतो असा कोणाचाही डोक्यामध्ये विचार आला नव्हता .
आमच्या आयुष्यामध्ये तरी दुसरं काय सुरु आहे . धाव म्हटलं की धावायचं ही सवय पडलेली आहे . मग कोणी पैसाच्या मागे धावतो . कोणी फक्त पोटासाठी धावतोय .   धाव - धाव धावतोय .  परंतू ही धाव कशासाठी ? याचं उत्तरं मात्र माहित नाही . ऍरीस्टोटलच्या कथेमधला जमिनीसाठी धावणारा जसा दिवसभर धावतो आणि शेवटी वर्तुळपुर्ण करतांना थकतो , पडतो , व मरतो . त्याला फ़क्त सहा फ़ुट जमीनीची गरज असते . परंतू त्यालाही माहित नव्ह्तं की , मी कशासाठी धावतोय . आणि मला किती जमीनीची आवश्यकता आहे . आमच्यापैकी जे धावत आहे . निरंतर धावत आहे . त्यांनी एकदा जरुर विचार करावा की , मी कशासाठी धावतोय आणि मी जेवढी धाव पळ करतोय . खरोखरच तेवढ्याची गरज आहे का ?  आणि मला या धावण्यामधून सुख , समाधान , यश शांती लाभते आहे काय ? आणि सर्वांत महत्त्वाचे म्हणजे मी ज्या दिशेने धावतोय ती माझी दिशा योग्य आहे ना !




3 comments: