Friday 12 August 2011

मराठी बोधकथा अपत्य


असेच एक झाड होते . त्याला मधुर फळे लागायची . सावली घनदाट होती. मुले त्या झाडाच्या सावलीत खेळायची . पाथंस्थ विसावा घ्यायचे .
झाडाखाली खेळायला येणार्‍या मुलांपैकी एका मुलाचा झाडाला लळा लागला .तो मुलगा झाडाला दररोज भेटायला येवू लागला. झाड त्या मुलाला दाट सावली आणि मधुर फळे द्यायचे . मुलाचे बोबडे बोल ऐकुनच झाडाचे पोट भरायचे . एक दिवस जरी मुलगा नाही आला तर तो आजारी पडला असेल काय ? त्याला काही झाले असेल काय ? अशी चिंता झाडाला वाटायची . दोघांच्या भेटण्याच्या , मैत्रीचा क्रम बरेच दिवस चालला.
पुढे मुलगा मोठा झाला. त्याचे लग्न होते. लग्नामध्ये खुप सारे पाहुणे जेवायला येणार होते .एवढ्या पाहुण्यांना कसे वाढायचे ? ताटे कोठुन आणायची ? मुलगा आपली चिंता घेवुन झाडाकडे गेला . झाडाने आपली सर्व पाने दिली व पत्रावळ्या करायला सांगितल्या .
पुढे मुलगा संसारात रमला . झाडाकडे जाईनासा झाला. पैशाची चणचण जाणवली . मग मुलगा झाडाकडे गेला. झाडाने आपली सर्व फळे देवुन टाकली . मुलाने ती बाजारात विकली . बरेच पैसे मिळाले .
पुढे घरी जाळायला विंधन नव्हते . पुन्हा अडचण सांगायला मुलगा झाडाकडे गेला. झाड म्हणाले माझ्या फांद्या तोडून घेवून जा . मुलाने कुर्‍हाडीने फांद्या तोडल्या . झाड बोडके झाले पण मुलाची अडचण दुर झाल्याचा पाहुन आनंदितच होते.
पुढे मुलाला घर बांधायचे होते . त्यासाठी त्याला लाकुड हवे होते . पुन्हा त्याला झाडाची आठवण झाली. गरज पड्ल्याशिवाय तो झाडाला भेटतही नसे मुलगा झाडाकडे गेला. आपली अडचण सांगितली झाड म्हणाले, माझा बुंधा तोडुन घेवुन जा .मुलाने कुर्‍हाडीने सपासप घाव घातले. बुंधा तोडला . घर बांधले .
जागी उरले फक्त झाडाचे खुंट . त्याला मुलाची खुप आठवण येते .पण मुलगा आता त्याच्याकडे ढुकुनही पाहात नाही. आई वडील या झाडासारखे. मुलांच्या शिक्षणासाठी , त्याच्या रोजगारासाठी, लग्नासाठी आपले सर्व काही देऊन टाकतात . मग काहीही शिल्लक न उरलेले आई वडिल मुलांना झाडांच्या खुंटांसारखे निरुपयोगी वाटतात . आई वडिल आतुरतेने मुलांची वाट बघतात . मुले मात्र ढुंकुनही पाहात नाहीत .






4 comments:

  1. अतिशय सुंदर बोधकथा! आजकालच्या आईवडिलांची स्थिती दर्शविणारी! मातृ-पितृ ऋण, गुरुचे ऋण आणि समाज ऋण ह्यातून कधीही मुक्त होता येत नाही. खरे तर ह्या ऋणात राहणे ह्यातच खरी धन्यता आहे आणि ते ऋणानुबंध जपणे, हे प्रत्येकाचे कर्तव्य आहे.

    ReplyDelete
  2. manala sparsh karnari bodhdhkatha ...

    ReplyDelete