Saturday 6 August 2011

आधुनिक बोधकथा रवा


बाजारातून एकदा रव्याचे पाकीट आणले . घरी पाहुणे येणार होते . उपमा करायचा होता . म्हणून जरा जास्तच रवा आणला होता . पण एकाकी पाहुण्यांचे येणे रद्द झाले . आणि तो रवा तसाच पडुन राहला त्याकडे दुर्लक्ष झाले . जसा आणला होता .  आणि जेथे ठेवला होता . तिथेच तो जवळ जवळ दोन महिने पडुन राहिला.
अचानक पुन्हा निरोप आला की , पाहुणे येणार . अर्थात हे पाहूणे वेगळे होते . आणि मग कुठे त्या रव्याची आठवण झाली आणि जेव्हा त्या रव्याचे पाकिट पाहीले तेव्हा त्यामधील सर्व रवा अळ्या पडून खराब झाला होता . त्याचा आता काहीही उपयोग नव्हता .
अळ्यांनी या रव्याचा भुगा करुन टाकला होता . व त्यामध्ये त्यांनी अंडी घातली होती . आता त्या रव्याचा काहीही उपयोग नव्हता . अर्थात दोन महीन्याचे कालावधीमध्ये जर त्या रव्यावरुन हात फिरविला असता , त्याला वाळू घातले असते , उन्हा तान्हामध्ये तापू दिले असते , तर त्यामध्ये अळ्या मुळीच तग धरु शकल्या नसत्या आणि तो रवा सुस्थितीत राहिला असता .
मनामध्ये अचानक विचार आला की ,माणसाच्या व्यक्तीमत्वाचे ही असे नाही का? जर ते एका कोपर्‍यामध्ये पडून राहले तर ते सडून जाते कूजुन जाते . व्यक्तीमत्व कसे राहिले पाहिजे ? त्याने उन्हातान्हाचे चटके सोसले पाहीजे तेव्हा कुठे ते सशक्त राहते .
      ज्या व्यक्तीमत्वाला कोणताही आघात सहन करावा लागत नाही . ज्या व्यक्तीमत्वावरुन कुणीही हात फिरवत नाही . ज्या व्यक्तीमत्वाला संकटरुपी उन्हाचे चटके लागत नाही .त्या व्यक्तीमत्वाला काळरुपी अळ्या असेच पोखरुण टाकतात . मग आता येणार्‍या संकटांना काय म्हणावे?

No comments:

Post a Comment