Monday 8 August 2011

आधुनिक बोधकथा तु कोणाचा

 
     जिवनामध्ये काही गोष्टी क्रमाने येतात. म्हणूनच आम्ही जिवनक्रम अशा शब्दाचा प्रयोग करतो . जिवनातील काही क्रम हे शारीरिक असतात. काही मानसिक असतात . नात्यांमध्येही असे क्रम आढळून येतात . क्रमानुसार स्थिती बदलत जाते .
      एक जोडपे होते . पती पत्नी आनंदाने राहात होते . पत्नी गर्भवती होती . तिला जुळे मुलगे झाले . दिवसेंदिवस मुले वाढू लागली . आई बाबा मुलांची जिवापेड जपवणूक करत होते . मुले सुमारे तीन वर्षाची झाली. बोलू लागली. आई बाबा त्यांना गमतीने विचारु लागली, तु कोणाचा ? मुलांना आईचा लळा जास्त होता. शेवटी आईच ती ! तिची जागा कोण घेवू शकणार ? दोनही मुले म्हणायची मी आईचा !    मी आईचा !  आई बाबा मुलांचे कौतूक करायचे .
      मुले थोडी मोठी झाली सुमारे पाच वर्षाची झाली. आई इतकेच बाबाही महत्त्वाचे , ते खावू आणतात, हे मुलांना कळू लागले होते . आई बाबा मुलांना विचारायचे तु कोणाचा ? समजू लागलेली दोनही मुले आता समजुतदारपणे उत्तर द्यायची , मी आई बाबा दोघांचाही ! आई - बाबा दोघेही आनंदून जात असत .
     काळ वेगाने पुढे सरकला . मुले मोठी झाली . त्यांची लग्ने झाली . त्यांच्या बायका आल्या . मुले अजूनही आई वडिलांवर प्रेम करत होती. आई वडिलांवर आपल्या नवर्‍याचा विशेष जीव आहे हे त्यांच्या बायकांना जाणवले . ते त्यांना प्रेमाचे वाटेकरी वाटू लागले. शेवटी त्यांनी आपआपल्या नवर्‍याला प्रश्न केला  , तुम्ही कोणाचे ? तुमच्या आई बाबाचे की माझे? समजूतदार नवर्‍याने उत्तर दिले , मी तुझाच !
           काळ आणखी पुढे सरकला . या आई वडीलांची मुले आणखी मोठी झाली .  आई वडील म्हातारे झाले . मुलांनी वेगळे व्हायचा निर्णय घेतला . एकाने आईला सांभाळावे, एकाने वडीलांना सांभाळावे असे परस्पर ठरवुन टाकले . आई वडिलांना प्रत्यक्ष बोलावले आणि विचारले तुम्ही कोणाचे ? कोण कोणत्या मुलासोबत राहणार ? बिचारे आई वडिल , म्हातारे, अगतिक , काय उत्तर देणार ? 

4 comments:

  1. Uttar Deu Shakat naahi karan me niruttar zalo im sorry

    ReplyDelete
  2. tyanchyasarakha mi dekhil agatik kai uttar denar?

    ReplyDelete
  3. chhan katha aahe, aho hi fact aahe.kay uttar denar?

    ReplyDelete