Saturday 30 July 2011

आधुनिक बोधकथा - कोळी डोह आणि हिरे



 
एक गाव होते त्या गावामध्ये एक कोळी राहायचा . गावाच्या शेजारी नदी होती . नदीमध्ये एक डोह होता . हा डोह अत्यंत खोल होता . एक बाज विनायला जेवढी दोरी लागते तेवढी या डोहाची खोली आहे . अशी गावात वदता होती . कोळी दररोज सकाळी पाच वाजता उठायचा , खांद्यावर जाळे टाकायचा आणि डोहावर मासेमारी करण्यासाठी जायचा . डोहाच्या खोलाची त्याला पुर्ण कल्पना होती .
असाच एकेदिवशी भल्यापाहाते हा कोळी उठला . खांद्यावर जाळे टाकले आणि डोहाकडे चालु लागला. अजुन सुर्योदय झाला नव्ह्ता . रस्यावर अंधारच होता . पण सवयीचा रस्ता असल्यामुळे हा कोळी सहजगत्या पावले टाकत होता .
डोहाकडे चालत असतांना कोळ्याचा पाय कशालातरी ठेचाळला. त्याने ज्यामुळे ठेच लागली त्यावस्तू कडे पाहण्याचा प्रयत्न केला. पण अंधारामुळे त्याला स्पष्ट दिसू शकले नाही . परतू स्पर्शामुळे ती खड्याने भरलेली पिशवी  आहे . हे त्याला जाणवले. ज्या खड्याच्या पिशविला तो ठेचाळला होता . ती पिशवी सोबत घेवून तो डोहाकडे पुन्हा चालू लागला . डोहापर्यत पोहोचला .
अजुन अंधारच होता . जाळे टाकता येणे शक्य नव्हते . सहज म्हणून त्या कोळ्याने ती खड्याची पिशवी उघडली . तीच्यामधले काही खडे हातात घेतले . विरंगुळा म्हणून एक खडा त्या अतीखोल डोहाच्या पाण्यात फेकला . डबकन आवाज झाला. कोळ्याचे मनोरंजन झाले . एक एक खडा तो डोहात फेकू लागला . आवाज होत होता . आता शेवटचा खडा फ़ेकण्यासाठी त्याने हातात घेतला . तो खडा चमकून उठला . मुळात तो खडा नव्हता हिरा होता . कोळ्याने आतापर्यत डोहात फेकले होते लाख मोलाचे हिरे . पण ते परत मिळविता येणे शक्य नव्हते . आम्हच्या आयुष्याचा प्रत्येक क्षण हिर्‍याइतका मौल्यवान . काळ त्या खोल डोहासारखा . न वापरलेला प्रत्येक क्षण काळाच्या खोल डोहात जावुन पडतो . येणारा प्रत्येक क्षण हिर्‍याइतका मौल्यवान मानुन त्याचा सार्थ उपयोग करुया !  
 for more articles pl. visit my blog  preranakhawale.blogspot.com 

3 comments:

  1. Sundar........**** Star Out of 5

    ReplyDelete
  2. मस्त ...... असेच सुरु ठेवा ...... परत लहानपण आल्यासारखे वाटले......

    ReplyDelete