Thursday 28 July 2011

आधुनिक बोधकथा - खोबरे




नागपंचमीचा सण होता . आईने मला दुकानातुन ओले नारळ आणायला सांगीतले मी वाण्याकडे जावुन घेवुन आले .
आज मी आणलेल्या नारळावर जरा जादाच काथ्या होता . हातात पेचकच घेवून, त्याच्या मदतीने मी नारळावरचा काथ्या काढू लागले . काथ्या त्या नारळाला घट्ट चिकटलेला होता . मोठ्या परिश्रमानंतर तो काथ्या , त्या नारळापासुन मी वेगळा केला . एक मजबुत दगड मांडला . त्या दगडावर  तो आदळला.  कवटी फ़ुटली तेव्हा कुठे आतले  चवदार , पांढरेशुभ्र खोबरे हाती आले .
त्या नारळाकडे पाहात मी विचार करु लागले. नारळाच्या सर्वात वर काथ्या आणि त्याखाली कवटी आहे . वरचा काथ्या काढावा लागतो . कवटी फ़ोडीवी लागले . त्यासाठी परिश्रम घ्यावे लागतात . तेव्हा कुठे फ़ळ म्हणून हाती खोबरे येते. म्हणजे परिश्रमानंतरच खरे फ़ळ हाती लागते .
वरवर कमी महत्वाची वस्तू आणि आतमध्ये अधीक मौल्यवान वस्तू अशीच निसर्गाची रचना असल्याचे दिसून येते . केळ्याचे साल बाजूला केल्याशिवाय आतला गर मिळत नाही . संत्रा , मोसंबी इ. फ़ळांची साल बाजूला सारावी लागते , तेव्हाच कुठे या फ़ळांचा आस्वाद घेता येतो .
जमीनीत वरच्या बाजूला खडक असतो . अत्यंत परिश्रमापुर्वक हा खडक फ़ोडून काढावा . तेव्हा कुठे जमीनीच्या आत गोड पाण्याचे , झरे लागतात .
प्रुथ्वीच्या पोटात मौल्यवान रत्नाच्या खाणी आहेत . परतू त्यासाठी कठोर परिश्रम घेवून वर वरची माती आणि खडक बाजुला सारावे लागतात . तेव्हा कुठे ही मौल्यवान रत्ने हाती लागतात .
आमच्या आयुष्यामध्ये यश म्हणजे नारळातील खोबरे परंतू हे या यशावर नानाविध अडचणींचा काथ्या आणि कवटी झाकलेली असते . हा काथ्या काढावा लागतो . कवटी फ़ोडावी लागते . म्हणजेच कठोर परिश्रमाने अडचणींवर मात करावी लागते . कुठे यशाचे खोबरे आमच्या हाती लागते . आयुष्यात जर यशाचे खोबरे खायचे असेल तर अडचणींचा काथ्या दुर सार्‍यावाच लागेल .


1 comment:

  1. Katheche ani Vyatheche samishra chitran farach chhan ahe.....!!!

    yethe vyatheche chitaran kami disun katheche chitran chaan disate..........

    Maala farshi awadali nahi pan hyacha aarthe kathet kahi kami ahe assa bilkul hot nahi..

    *** star out 5

    Vyathechya chitranachi Waat nakki baghen!!!!!

    ReplyDelete