Monday 25 July 2011

मराठी बोधकथा - पाण्याचा रंग





कापड हा कित्येकांच्या जीव्हाळ्याचा विषय. आपल्याला हवे तसे कापड मिळावे म्हणुन लोक उन्हाळ्याच्या भर उन्हात, दुपारी एका दुकानातुन दुकानात भटकताना दिसतात .
     
     कपडे खरेदी करताना आम्ही जेवढे कपड्याचा पोताला महत्व देतो त्यापेक्षा अधीक महत्व कपड्याच्या रंगाला देतो . कापड कितीही चांगले असेल् पण त्याचा रंग जर मनासारखा नसेल,  तर आपण ते कापड निवडणार नाही.  याउलट मनासारखा शेड मिळाला म्हणुन , कमी पोताचे कापड खरेदी करणारे कित्येक जण सापडतील . मला कापडाचा पोत गुणासारखा वाटतो आणि कापडाचा रंग भावनेसारखा ! रंगावर भाळुन जेव्हा एखादी व्यक्ति कमी पोताचे कापड खरेदी करते. तेव्हा गुणांवर भावनेने मात केली, असेच मला वाटते.

      असो ! एकदा मला साडी खरेदी करावयाची होती. मैत्रिणी सोबत दुकानात गेले.        निळ्या काळपट रगाच्या साडीची निवड केली. साडी घरी आणली . टेबलावर ठेवली. उन्हाळा जाणवत होता. पाणी प्यायला घेतले. आणि पिताना थोडे पाणी साडीवर सांडले साडीवर पाणी सांडल्यामुळे साडीचे काही नुकसान होणार नव्हत . मी चट्कन सांडलेले पाणी पुसुन काढले. पण साडीत जेवढे पाणी मुरायचे तेवढे मुरलेच आणि साडीचा काही भाग ओला झाला .

साडीचा ओला झालेला भाग स्पष्ट  दिसत होता . पाण्याला कोणताही रंग नाही . पण पाण्याने ओले झालेले मात्र स्पष्ट दिसत होते . मी काळजीपुर्वक पाहिले. माझ्या लक्ष्यात आले की, ओला झालेल्या भागावरील रंग अधीक चटक दिसत होता. अधीक उठावदार  दिसत होता.

साडीच्या रंगावरुन आणि पाण्यावरुन माझे मन महाराष्टाच्या भुगोलावर आणि पाण्यावर धाव घेवु लागले. जेथे पाणी सांडले आहे अर्थात जेथे धरणे बनली आहेत, त्या भागाचा नकाशावरील रंग अधिक हिरवागार झाला आहे . कारण त्या पाण्याने बागा फुलवल्या आहेत . आहे की नाही पाण्याची गंमत ! त्याला रंग नाही पण रंग देण्याची अद् भुत क्षमता मात्र त्यात आहे !


No comments:

Post a Comment