Thursday 1 September 2011

मराठी बोधकथा सवय




        मानवाच्या इतिहासातील सर्वात क्रांतीकारी घट्ना म्हणजे मानवाला लागलेला शेतीचा शोध . जर मानवाला शेती कशी करावयाची याचे तंत्र अवगत झाले तर कदाचीत मानवाने आज रोजी जेवढी प्रगती केलेली आहे . तेवढी प्रगती मानव कदाचीत करु शकला नसता .
      शेती करण्याच्या तंत्राणेच मानवाच्या असंख्य पिढ्या जगवल्या आहेत . शेती पाहायला मला खुप आवडते . विशेषत: शेतकरी जेव्हा नाविण्यपुर्ण उपक्रम राबवतात तेव्हा अशा शेतकर्‍यांच्या शेताला भेट देण्याची उत्सुकता वाटते . कुणी मोठ्या आकाराचे फळ येणारी पपई लावलेली असते . कुणी अधिक उत्पादन देणारी टमाटरची जात लावलेली असते . कुणी वाग्यांचे विक्रमी उत्पादन घेतलेले असते .

      शेती उत्पादनासोबतच शेतकरी इतर ही नाविण्यपुर्ण उपक्रम राबवतात . एका शेतकर्‍याने तर चक्क अर्ध्या एकरामध्ये शेततळे खोदुन त्यात मत्स्यशेती केल्याचे मला आढळून आले. सिंचनाच्या आधुनिक उपकरणांचा वापर करुन पाण्याची बचत करणारे व कमी पाण्यावर अधीक पिक घेणारे शेतकरी देखील भेटले .
       अशीच एकदा संत्र्याचा बागेला भेट दिली . बागेत निंदण सुरु होते . बाया गवत काढुन टाकत होत्या . ते पाहुन माझ्या मनात विचार आला.  संत्री , पेरु , सफरचंद ही उपयुक्त फळ झाडे वाढवावी लागतात . त्यांच्या कलमा तयार करा , डोळे बांधा , लावा, मशागत करा , खत पाणी घाला . तेव्हा कुठे ही झाडे जगतात . चांगल्याचे संवर्धन करावे लागते . वाईट असणारे , नको असणारे , गवत मात्र आपोआप वाढते . त्याच्या वाढीसाठी कोणतेही प्रयत्न करावे लागत नाही . तर ते काढुन टाकण्यासाठी प्रयत्न करावे लागतात.
       फळझाडे ही मला चांगल्या सवयीसारखी वाटतात . त्यांची जोपासना आणि संवर्धन करावे लागते . गवत हे वाईट सवयी सारखे . थोडे दुर्लक्ष झाले की फोफावणारे ! 









No comments:

Post a Comment